Breaking
ब्रेकिंग

करमाळा नगर परिषद निवडणूकीत 71 नगरसेवक व 5 नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणुक रिंगणात

0 9 0 0 1 9

करमाळा नगर परिषद निवडणूकीत 71 नगरसेवक व 5 नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणुक रिंगणात

करमाळा /  (विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी))

करमाळा नगर परिषद निवडणूकीत आज उमेदवारी अर्ज माघार काढुन घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 62 नगरसेवक व 3 नगराध्यक्षपदासाठी असे एकूण 65 जणांनी आपले उमेदवारी अर्ज काढुन घेतल्याने 71 नगरसेवक व 05 नगराध्यक्षपदासाठी असे एकूण 76 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.
जगताप गटाचे(शिवसेना शिंदे पक्ष)21,भाजपचे 21,शहर विकास आगाडीचे 21आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार)यांचे 08 तर रासपचे नगराध्यक्षपदासाठी रासपच्या 01 व अपक्ष 01असे एकुण 76 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष (जगताप गट)चे 20 नगरसेवक व 01 नगराध्यक्षपदासाठी असे 21,भाजप 20 नगरसेवक व 01 नगराध्यक्षपदासाठी,शहर विकास आघाडी (सावंत गट )20 नगरसेवक व 01 नगराध्यक्षपदासाठी आणि रासप फक्त नगराध्यक्षपदासाठी 01 व अपक्ष 01,राष्ट्रवादी काँग्रेस फक्त नगरसेवकपदासाठी 08 अशी निवडणुक होणार असून खरी लढत शिवसेना,भाजप व सावंत गट अशीच होईल असे जाणकार बोलत आहेत.
जगताप गट (एकनाथ शिंदे पक्ष ) कडून सौ. महानंदा उर्फ नंदिनीदेवी जयवंतराव जगताप,भाजपकडून सौ.सुनंदादेवी कन्हैयालाल देवी आणि शहर विकास आघाडी (सावंत गट)सौ.मोहिनी संजय सावंत,रासपकडुन सौ भावना भद्रेश गांधी आणि अपक्ष प्रियांका वाघमारे असे पाच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगर परिषदेच्या कुरुक्षेत्रावर उभे आहेत. एकंदरीत आता निवडणुकीचे चित्र हळु हळु स्पष्ट होणार आहे. अद्याप प्रचार यंत्रणेने जोर धरला नसला तरी उमेदवारांच्या घरोघरी भेटीगाठी घेण्यास सुरुवात झाली आहे. चिन्ह वाटप 25 रोजी असल्याने पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेले उमेदवार आपल्या चिन्हाचा प्रचार करत आहेत. तर शहर विकास आघाडीला मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचविण्यास विलंब जरी होणार असला तरी त्यांनी शहरात प्रचार यंत्रणा व गाठीभेठीतुन मतदारांपर्यंत पोहचण्यात आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे.

यावेळी जयवंतराव जगताप गट शिवसेनेकडून स्वतंत्र असुन भाजपसोबत बागल गट,नागरिक संघटना व गणेश चिवटे अशी ताकद एकत्रीत आली आहे. तर शहर विकास आघाडी (सावंत गट)यांनी शिवसेना व भाजप पुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी आपली ताकद निर्माण केली आहे .

. . . .

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप सोबत एकत्रीत निवडणूक लढविण्याची तयारी झाली होती मात्र ऐनवेळेस भाजप आपल्याला अपेक्षित जागा देत नसल्याने त्यांनी आपले 08 उमेदवार स्वतंत्र लढविण्याची घोषणा तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी केली असली तरी नगराध्यक्षपदासाठी आम्ही भाजपचे उमेदवारसोबत असल्याचे जाहीर केले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे