पुणे येथील स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील खेळाडूंचे नेत्र दीपक यश

पुणे येथील स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील खेळाडूंचे नेत्र दीपक यश
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
दिनांक 25 व 26 एप्रिल 2016 रोजी पुणे येथे पार पडलेल्या स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्र दीपक अशी कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. खेळाडू स्केटिंग या खेळा प्रकारातून शारीरिक तंदुरुस्ती, स्फूर्ती, संयम इत्यादी मूल्य अंगीकारत असतो. त्यामुळे बहुसंख्या खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या चॅम्पियनशिप मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच इनफिनिटी स्केटिंग क्लब च्या मुलांनी गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉझ मेडलची कमाई करत उत्कृष्ट खेळाचा नमुना सादर करून खेळातील प्राविण्य संपादित केले.

खेळाडूंच्या या यशामागे स्केटिंग प्रशिक्षक श्री गोरख धात्रक, श्री विजय माळुदे, श्री सुशील केदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशामुळे अहिल्यानगर मधून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.


