शेतकऱ्यांना वाढीव मदत करा : प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे

*शेतकऱ्यांना वाढीव मदत करा : प्रा. ज्ञानेश्र्वर बनसोडे*
*अहिल्या नगर जिल्हा: प्रतिनिधी -* राज्यात यंदा अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत हाताशी आलेली पिके जळून खाक झाली आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची तुटपुंजी मदत वाढवून अधिक आर्थिक मदत करावी, अशी मागणी रयत शिक्षण संस्थेचे मा. प्रा व *पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे* यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे एका पत्रकाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत त्यानी माहिती व कार्यवाही करिता मा. जिल्हाधिकारी यांना देखील रवाना केली आहे.
. प्रा.बनसोडे यांनी म्हटले आहे की, केवळ पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही. शासनाने भरीव आर्थिक मदत दिल्यास शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येईल. तसेच सध्या हिवाळ्यातच पाणी व चाऱ्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था युद्धपातळीवर करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



