मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा गुंडेगाव येथे संपन्न….*
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच विविध समित्यामार्फत गावागावात शाश्वत विकास साधण्यावर भर.
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा गुंडेगाव येथे संपन्न….*
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच विविध समित्यामार्फत गावागावात शाश्वत विकास साधण्यावर भर.
वाळकी प्रतिनिधी :- दादासाहेब आगळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत
लोकचळवळ उभी करण्यासाठी अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत आरोग्य विभाग,कृषी विभाग, अंगणवाडी सेविका,आशा सेविका या विभागांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अभियानाची उद्दिष्टे, भूमिका आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात यावा.विविध ग्रामविकास समितींची स्थापना करणे,ग्रामपंचायतींनी पी.एम आवास, जलसंधारण आणि महसुलाशी संबंधित कामे वेळेत करणे तसेच समन्वय ठेवणे.
ग्रामपंचायतीना अभियानात पात्र होण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी.या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने यांचे नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सुचना दिल्या.महिला बचतगट, वृक्ष लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे. सौरदिवे स्वच्छता या सारखे गावात नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घेणे.स्वामित्व योजना, मिशन कायाकल्प, आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जल्लोषाने सहभागी व्हावे, यासाठी बुधवार १७ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी माणिक होनकर्पे यांनी केले.
यावेळी उपस्थितांमध्ये उपसरपंच नानासाहेब हराळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, विठ्ठल भापकर गुरुजी,आरोग्य विभागाच्या चव्हाण मॅडम, कृषी विभागाचे ज्ञानेश्वर पाडूंळे, शिवाजी हराळ मेजर, विद्युत विभागाचे डोमल साहेब, बाबासाहेब कोतकर आशा सेविका मनिषा कुताळ,प्रिती भापकर, अंगणवाडी सेविका लता राऊत ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी भापकर, अमोल गाढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



