Breaking
ब्रेकिंग

वर्षावास प्रवचन मालिकेचे तक्षशिला बुद्ध बिहार शिरसगाव बोडखा येथे उद्घाटन संपन्न

0 7 6 9 3 4

वर्षावास प्रवचन मालिकेचे तक्षशिला बुद्ध विहार शिरसगाव बोडखा येथे उद्घाटन उत्साहात संपन्न

श्रीगोंदा /  प्रतिनिधी :  आदेश उबाळे

भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका शाखा या धम्म संस्थेच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वर्षावास प्रवचन मालिका ” आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ” या कालावधीमध्ये संपुर्ण तालुक्यात राबविला जाणार असून या मालिकेचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी तक्षशिला बुद्ध विहार शिरसगाव बोडखा येथे संपन्न झाला,
व पहिले पुष्प गुंफण्यात आले.
केंद्रीय शिक्षक व व्याख्याते प्रा. प्रशांत चव्हाण यांनी आपल्या शब्दपुष्पामध्ये वर्षावास याविषयी आपले विचार मांडले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शांताराम उबाळे हे होते.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण सरचिटणीस सतीश ओहोळ, जिल्हा संघटक भगवान ओहोळ, तालुका सरचिटणीस आबासाहेब रजपूत कोकणगाव सरपंच, पर्यटन सचिव प्रमोद जाधव, तालुका संरक्षण सचिव पंडित कांबळे, श्रामनेर हर्षल अडबले संघटक, संरक्षण विभाग अनिल उबाळे, बाळासाहेब उबाळे, अमोल रोहिदास उबाळे, सुनील उबाळे, नवनाथ जौजाळ, शुभम उबाळे उपासक- उपासिका, महिला वर्ग उबाळे परिवार उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी पाहिले तर आभार संतोष उबाळे यांनी मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम उबाळे यांनी आंबेडकरांचे गीत आपल्या सुंदर सुरातून गात कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे