कडधान्य पिकाचे करा एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन : श्री. नारायण निबे

कडधान्य पिकाचे करा एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन : श्री. नारायण निबे
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रमअंतर्गत आज दिनांक 4 जून 2025 रोजी तालुका नगर येथील मौजे निंबळक, इसलक व खारे कर्जुने या ठिकाणी शेतकऱ्यांना तुर, मुग उडीद या पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त गोठा व जनावरातील रोग निर्मूलन विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथील श्री. नारायण निबे, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) श्री. सचिन बडधे विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) डॉ. चंद्रशेखर गवळी विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान)
श्री. प्रकाश बहिरट कार्यक्रम सहाय्यक (प्रयोगशाळा) तसेच जेऊरच्या मंडळ कृषी अधिकारी श्रीमती घोरपडे मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री विजय सोमवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री चैतन्य बडवे व आत्मा चे सहाय्यक तंत्र व्यवस्थापन श्री उमेश डोईफोडे उपस्थित होते.