Breaking
ब्रेकिंग

पत्रकार श्री सखाराम पोहिकर यांना समाजक्रांती भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

0 8 6 6 6 2

पत्रकार श्री सखाराम पोहिकर यांना समाजक्रांती भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

राहुरी तालुका जावेद शेख

अमरावती येथील यश पॅलेश मध्ये दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला . बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित न्युज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाज क्रांती पुरस्कार सोहळ्यात दैनिक विदर्भ सत्यजित चे बीड जिल्हा प्रतिनिधी . ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेशउपाध्यक्ष . व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांना समाज क्रांति राज्यस्तरीय पुरस्कार सिनेअभिनेते योगेश पवार यांच्याशुभहास्ते व विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये सखाराम पोहिकर गढी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार सखाराम पोहिकर यांना अद्याप पावेतो दोन राज्यस्तरीय पुरस्कारानी विविध मान्यवरांच्या शुभहास्ते सन्मानित करण्यात आले आहे यावेळी अनेक फिल्म स्टार रील स्टार निर्माते दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला 17 ऑगस्ट 2025 हा ऐतिहासिक दिवस ! निमित राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक संत गाडगेबांबाच्या पुण्यपावनभूमी अमरावती मध्ये समाज क्रांती पुरस्कार सोहळा पार पडला यास संबध विश्वाला ज्यांनी स्वच्छतेचा महामंत्र दिला अज्ञान अंधश्रध्दा निरक्षरता यावर जनप्रबोधन करून समाजाचे उत्खनन करून समाजप्रबोधन करून जागृती केली असे महान संतश्रेष्ठ आदरणीय संत गाडगेबाबा छत्रपती शिवाजी महाराज शाहु महाराज महात्मा ज्योतीबा फुले सावित्रीबाई फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई लोक शाहिर आण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध राष्ट्रपुरुषांच्या पावन राष्ट्रात हा समाज क्रांती भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने श्री सखाराम पोहिकर यांना सन्मानित करण्यात आले आहे तेव्हा सखाराम पोहिकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बीड जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक मित्र मंडळ पत्रकार व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्गातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे व पुढील काळात आपल्या लेखनीतुन समाज कार्य घडो हीच आपणा कडून अपेक्षा आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे