काँग्रेस- महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार समर्थनार्थ सोलापूर येथे इंटक कामगार मेळावा:- इंटक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनाची भूमिका स्पष्ट करणार:- इंटक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव*
काँग्रेस- महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार समर्थनार्थ सोलापूर येथे इंटक कामगार मेळावा:- इंटक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनाची भूमिका स्पष्ट करणार:- इंटक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १५/ राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) सोलापूर येथे काँग्रेस- महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवार समर्थनार्थ इंटक कामगार मेळावा घेण्यात येणार आहे. सदर मेळावा काँग्रेस भवन सोलापूर शनिवार, दि. 16/11/2024 रोजी दुपारी 4.00 वाजता होणार असून सदर मेळाव्याचे आयोजन इंटक सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले आहे.
यावेळी बोलताना अमोल जाधव यांनी सांगितले की महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या विषयावर सर्व संघटनेशी आपण चर्चा करणार असून संघटनेचे, संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे, व सर्व कार्यकर्त्यांचे मत घेऊन आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत त्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे असे इंटकचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले.
या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार, डॉ. कैलास (भाऊ) कदम प्रदेशाध्यक्ष इंटक, बाबासाहेब चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष इंटक, एसटी कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकेश भाऊ दिगोटे, अमित भाटनागर इंटक मुंबई अध्यक्ष, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.