Breaking
ब्रेकिंग

नगर-मनमाड महामार्गावरील दुरवस्थेविरोधात रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन

0 7 6 9 3 2

नगर-मनमाड महामार्गावरील दुरवस्थेविरोधात रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन

खास बातमी : जावेद शेख ( राहुरी तालुका )

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांविरोधात नागरिकांचा उद्रेक झाला असून, नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या महामार्गावर झालेल्या शेकडो अपघातांत आतापर्यंत अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम व प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष या कारणांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनात समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे शासकीय वाहन त्या मार्गावर आले. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. मात्र संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे वाहन थांबवून धरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन सुरक्षेसह ताहराबाद मार्गे वळविण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे