Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक महेश पांडुरंग पलंगे यांचे अकस्मात निधन

0 3 9 0 5 4

करमाळा येथील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक महेश पांडुरंग पलंगे यांचे अकस्मात निधन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ करमाळा येथील महेश पांडुरंग पलंगे (वय ६०) यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महेश पलंगे हे बुलढाणा येथील सैलानी बाबांचे भक्त होते. रंगपंचमीच्या दिवशी असणाऱ्या उरुसासाठी ते रमजानचे रोजे ठेवून दर्शनासाठी निघाले होते. त्या दरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महेश ऑटो गॅरेजचे संचालक राहुल पलंगे, विजय पलंगे व ओंकार पलंगे यांचे ते वडील होत. महेश पलंगे हे जुन्या काळातील प्रसिद्ध बुलेट वाहनाचे मेकॅनिक होते. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे