Breaking
ब्रेकिंग

नात का दुरावत चाललय … ?

0 8 6 5 0 8

=नात का दुरावत चाललय?=
====================
नात दुरावत चाललय कारण आता आपल्याकडे एकमेकांसाठी वेळच उरला नाही. सकाळी उठल्यापासून पैश्याच्या मागे धावन सुरु होत. आणि रात्री थकुन झोपेपर्यंत^ कसा आहेस^ विचारायचे राहून जाते. मोबाईलचे स्क्रीन ने डोळे बांधले आणि जवळ बसलेल्या माणसाला आपण विसरलो. लहान सहान गैर समज आपण मनात ठेऊन अबोला धरला.पण ^सॉरी^ म्हणायला अहंकार आडवा आला. अपेक्षाच ओझ इतकं वाढल की समोरच्याचा श्वास गुदमरला. आणि तो हळू हळू दूर गेला.
सुखाचे चार दिवस सगळे सोबत असतात. पण दुःखाच्या काळातील हाक मारायला कोणीच उरत नाही. संपली की माणसं ही संपतात. हीच स्वार्थी वृत्ती नात्याच्या मुळावरच घाव घालत असते. सोशल मीडियावर हजारो फ्रेंडस आहेत. भरल्या डोळ्यांना पुसायला एकही पुढे येत नाही. आपण सगळे^मी,माझं यात इतके अडकलो की; ^आपलं^ हा शब्दच विसरून गेलो. त्याग करायला; समजून घ्यायला; माफ करायला लागणार मोठ काळीज आता लहान झालय. तरीही कधीतरी रात्री अप रात्री फोन वाजला की मनात आशा वाटते कोणीतरी आठवण काढली असेल. कारण कितीही भांडण झालं ;कितीही दुरावाआला; तरी मायेचा रक्ताचा धागा पूर्ण तुटत नाही. तोच धागा पुंन्हा घट्ट व्हावा. तुटलेली नाती पुन्हा जुळावी. हीच खरी कळकळ आहे.
यासाठी सर हे सोशल मीडिया मार्फत सतत समाज प्रबोधनाचे काम करीत यानिमित्ताने जर समजा आपली कुणाची आपापसातील नाती समज अथवा गैरसमजातून दुरावली असतील तर तो नात्याचा धागा पुन्हा जुळावा अशी आशा बनसोडे सर यांनी या लेखाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे..
=शब्द रचना=
श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे ( सर)
साकुरी. ता. राहाता.जिल्हा. अहिल्या नगर
भ्रमणध्वनी= ९६०४७९७३१६

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे