जवळे कडलग येथे चार वर्षीय चिमुरड्याचा बिबट्याने घेतला बळी

जवळे कडलग येथे चार वर्षीय चिमुरड्याचा बिबट्याने घेतला बळी
संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे चार वर्षीय चिमुरड्याचा बिबट्याने बळी घेतला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याच्या गळ्यावर व डोक्याला बिबट्याचे दातलागल्याने सिद्धेश सुरज कडलग (रा. जवळे कडलग, ता. संगमनेर)याचा जागीच मृत्यू झाला.शनिवार सायं 6:30 वाजण्याच्या दरम्यान सिद्धेश सायंकाळच्या वेळी घराच्या परिसरात खेळत होता.घरातील काही जण जनावरांसाठी कुटी मशीन मध्ये चाऱ्याची कुटी करत होते.त्यावेळी घराशेजारी असणाऱ्या उंच गिणीगवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर लहानग्या सिद्धेश वर पडली. बिबट्याने सिद्धेश चे उचलून गिणीगवताच्या शेतात नेले. त्यावेळी या चिमुकल्याच्या आजीने आरडा ओरडा केला. तेथे गर्दी जमली. नागरिकांनी गिनींगवताकडे धाव घेतली असता आवाजाने बिबट्याने चिमुरड्याला सोडले. त्यानंतर तात्काळ चार वर्षीय सिद्धेशला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. मात्र तोपर्यंत चार वर्षांच्या चिमुकल्याने आपला जीव गमावला रुग्णलयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
जवळे कडलग गावात काही अंतरावर कडलग वस्ती आहे.
मयत सिद्धेशचे आई वडील हे शेती व दुग्ध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात.घरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने आजूबाजूला शेतीत देखील जनावरांसाठी चारा केला आहे.मात्र तेथे बिबट्या दबा धरून बसला होता हे कदाचित कोणाच्या लक्षात आले नाही. सर्वजण घरच्या कामात व्यस्त होते.चिमुकला सिद्धेश देखील सायंकाळच्या वेळी घराच्या परिसरात खेळत होता. घरातील काही जण जनावरांसाठी कुटी मशीन मध्ये चाऱ्याची कुटी करत होते.त्यावेळी घराशेजारी असणाऱ्या मोठ्या गिणीगवतातून बिबट्याची नजर या चिमुरड्या सिद्धेशवर पडली. त्याने या चिमुरड्याला एकटे असल्याचे पाहिले आणि डाव साधला.बिबट्याने गिणीगवतातून येऊन चारवर्षीय सिद्धेशवर हल्ला केला.त्याने चिमुरड्याचे डोके तोंडात घट्ट धरून गिणीगवतात नेले.ही सर्व घटना आजीने पाहिली आरडा ओरडा केला.तेथे एकच गर्दी जमली.
नागरिकांनी गिनींगवताकडे धाव घेतली असता आवाजाने बिबट्याने चिमुरड्याला सोडले. त्यानंतर तात्काळ चार वर्षीय सिद्धेशला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले.मात्र तोपर्यंत चार वर्षांच्या चिमुकल्याने आपला जीव गमावला रुग्णलयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून पुढील प्रक्रिया करत आहे.
जवळेकडलग परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढत असल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागासह आता शहरातील उपनगरात बिबट्यांचा वावर वाढत आहे.
जवळे कडलक येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाचे बालक ठार झाल्याचे माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ
आवश्यक उपयोजना करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. तसेच आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयत बालकाचे आई. वडील यांचे सांत्वन केले.
या घटनेने जवळे कडलग परिसरावर शोककळा पसरली आहे.तर संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ वाढत असल्याने त्यांच्या संख्येवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.ग्रामस्थांनी आम्हाला गावांमध्ये पिंजरा नको आम्हाला बिबट्या मारण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी शासनाकडे केली आहे.



