ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘जागतिक इंग्रजी भाषा दिवस’ जल्लोषात साजरा

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘जागतिक इंग्रजी भाषा दिवस’ जल्लोषात साजरा
वि. संपादक :- पंकज पाटील
चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ इंग्रजी लेखक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त ‘२३ एप्रिल – जागतिक इंग्रजी भाषा दिवस’ विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय रघुनाथ बारी (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, चोपडा), डॉ. झिशान सैय्यद (डॉ. जाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालय, यावल), प्रा.दिपाली पाटील ( डॉ. दादासाहेब सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा) शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी इंग्रजी भाषा दिनाच्या औचित्य साधत इंग्लिश लॅंग्वेज क्लबचे उद्घाटन संजय बारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय बारी यांनी सांगितले की, इंग्रजी ही जागतिक भाषा असून जगातील ६७ राष्ट्रांची कार्यालयीन भाषा आहे. तसेच सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांची संस्थांची ही भाषा आहे. संगणकावरील सुमारे ८० टक्के माहिती (डेटा) इंग्रजीत साठवली जात असून इंग्रजी ही विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण, संशोधन, शिक्षण, पर्यटन यासारख्या विविध क्षेत्रात वापरली जाते. यावेळी इंग्रजी भाषा संदर्भातील काही मनोरंजक आकडेवारी आणि माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
डॉ झिशान सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मूल्य संस्कारावर आधारित कथा सांगत जीवनातील शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले.
जागतिक इंग्रजी भाषा दिवसाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे परीक्षण डॉ. वाय. एन. पाटील आणि प्रा. दिपाली पाटील यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी इंग्रजी भाषेचा वापर करण्यासंदर्भात प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इ. आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी सुमधुर असे स्वागत गीत सादर केले. इंग्रजी भाषा दिनाच्या निमित्ताने इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी इंग्रजी ‘कविता पाठांतर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वैदेही समाधान पाटील, आयुष सचिन पाटील, हर्षा हर्षल पाटील, राजवीर स्वप्निल रणदिवे, नानक मलानी, मोक्षदा साळुंखे, विवेक कोळी, श्रीद जाधव हे विजयी ठरले. इयत्ता तिसरी साठी ‘कथाकथन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये आराध्या सचिन पाटील, तन्झिम पटेल, जीहान वळवी, भारद्वाज पाटील हे विद्यार्थी विजयी ठरले. इयत्ता चौथीसाठी ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिज्ञासा जितेंद्र पाटील, कनिष्का शुभम पाटील, अंशिका अविनाश जाधव आणि लवीन लालचंद पटले हे विद्यार्थी यशस्वी झाले. इयत्ता पाचवीसाठी ‘स्पेल बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये दिनार विठ्ठल पाटील, मयंक शशांक पाटील, भार्गव योगेश पाटील, वेदांत अमृत पाटील यांनी यश संपादन केले. इयत्ता सहावी साठी ‘रोल प्ले’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अनम सैय्यद, हर्षाली पाटील, पलक महाजन हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता सातवी आणि आठवीसाठी ‘डेक्लामेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सिया मेहेर, वृक्षाली सोनवणे, चैतन्य शिरसाठ, मोक्षाली मगरे आणि माही पालीवाल, प्रियांशी पाटील, क्षितिजा कोळी हे विद्यार्थी यशस्वी झाले. इयत्ता नववी साठी ‘वादविवाद’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सानिका महाजन, मुबाशिरा शेख , श्रीजा लासुरकर, प्रांजल अहिरे या विद्यार्थिनी यशस्वी झाल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्युलियस सीझर’ या विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकातील एका प्रसंगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील, दीप्ती पाटील, दिपाली पाटील, सुचिता पाटील, प्राजक्ता सोनवणे, वैशाली गायकवाड, जुईली ठाकरे, अश्विनी ढबू, श्रद्धा देशमुख या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी ढबू, दीप्ती पाटील, वैशाली गायकवाड, जुईली ठाकरे, श्रद्धा देशमुख व इयत्ता दहावीची विद्यार्थीनी ध्रुवी संदिप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राजक्ता सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील,यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.