राज्याचे शिक्षणमंत्री ,शिक्षण सचिव यांचे उपस्थितीत शिक्षिका संजना चेमटे यांचे वाचन उपक्रमाबद्दल सादरीकरण

राज्याचे शिक्षणमंत्री ,शिक्षण सचिव यांचे उपस्थितीत शिक्षिका संजना चेमटे यांचे वाचन उपक्रमाबद्दल सादरीकरण
_________________________
अहिल्यानगर _ महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शिर्डी येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत पाच मे रोजी यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांनी आपल्या वाचन उपक्रमाचे सादरीकरण करून मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल(आय. ए . एस.)महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे (एम. पी. एस. पी.)प्रकल्प संचालक संजय यादव (आय. ए.एस.)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक राहुल रेखावार (आय. ए . एस.),महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालक सरोज जगताप, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,
जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, काही उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि राज्यातील काही उपक्रमशील शिक्षक यांचे उपस्थितीत यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे यांनी आपल्या निरंतर वाचन उपक्रमाचे अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करून राज्यातील शिक्षकांना याबाबत मार्गदर्शन केले .
श्रीमती संजना चेमटे या कोरोना काळापासून निरंतर वाचन उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवीत आहेत. हा उपक्रम त्या कायमस्वरूपी राबवितात. शाळा चालू असताना आठवड्यातून एक दिवस शाळेत विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर सुट्टीतही हा निरंतर वाचन उपक्रम त्या राबवीत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवितात.यामध्ये विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांच्या घरी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी त्यांच्या आवडीची विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीतही विद्यार्थी आनंदाने अवांतर वाचनाची पुस्तके आनंदाने वाचत आहेत.जसे शिक्षण सर्वांसाठी तसे वाचन सर्वांसाठी याप्रमाणे श्रीमती संजना चेमटे यांनी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आई-वडील ,भाऊ, बहीण, घरातील इतर सर्वांना या वाचन उपक्रमात सहभागी केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वजण वाचन करत आहेत.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्याच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे. विद्यार्थ्यांबरोबर घरातील इतर सर्वजण वाचत असल्यामुळे घराघरात ही वाचन संस्कृती रुजण्यास मदत झाली आहे .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुट्टीचा सदुपयोग होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे असे पालकांनी सांगितले आहे .या उपक्रमाबद्दल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे ,प्रधान शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल ,एम. पी .एस .पी .चे प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार(आय. ए.एस.)बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील,
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेश बनकर, जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक खडूस , अनेक अधिकारी ,पालक यांनी या उपक्रमाबद्दल उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.या उपक्रमाची पुस्तिका त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे ,प्रधान शिक्षण सचिव रणजितसिंह देओल ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील संचालक राहुल रेखावार यांना भेट म्हणून दिल्या.सर्वांनी या उपक्रमाची पाहणी करून शिक्षिका संजना चेमटे यांच्या कार्याचे अभिनंदन केले.