पाणी वाचवा, जीवन वाचवा..

–
पाणी वाचवा, जीवन वाचवा..
– =================!*
पाणी हे जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण आज त्याची खरी किंमत आपल्याला कळायला लागली आहे. गावोगावी विहिरी आटल्या आहेत, बोअर कोरडे पडले आहेत, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, पण पाण्याचा वापर मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नळ सोडून दात घासणे, अंघोळीला भरपूर पाणी वापरणे, गळणारा नळ वेळेवर दुरुस्त न करणे, यातून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. पावसाचे पाणी साठवणे, छतावरील पाणी टाकीत जपून ठेवणे, झाडांना ठिबक सिंचनाने पाणी देणे, गावातील तलाव, विहिरी, ओढे स्वच्छ ठेवणे, हीच खरी पाणी बचत आहे. पाणी वाचवणे हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आज आपण एकही थेंब पाणी वाया जाऊ दिले नाही, तर उद्या आपल्या येणाऱ्या पिढीला पाण्यासाठी भटकावे लागणार नाही. मुलांना लहानपणापासून पाणी बचतीची सवय लावली पाहिजे, शाळा, मंदिर, कार्यालय, प्रत्येक ठिकाणी पाणी बचतीचा संदेश गेला पाहिजे. चला, आजपासून संकल्प करूया, एकही थेंब पाणी वाया जाऊ देणार नाही, कारण पाणी वाचवा, जीवन वाचवा, हाच खरा विकास आहे, हाच खरा धर्म आहे

=लेखक =
प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ
भ्रमण ध्वनी – ९६०४७९७३१६

