Breaking
ब्रेकिंग

जवानांना राखी बांधून विद्यार्थिनींचा देशसेवेला सलाम

रक्षाबंधनानिमित्त "स्नेहबंध'चा आर्मड स्टॅटिक वर्कशॉपमध्ये उपक्रम

0 8 6 5 2 1

जवानांना राखी बांधून विद्यार्थिनींचा देशसेवेला सलाम

रक्षाबंधनानिमित्त “स्नेहबंध’चा आर्मड स्टॅटिक वर्कशॉपमध्ये उपक्रम

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर – भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणाला देशसेवेची भावनिक किनार लाभली. पी.एम. श्री. डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी आर्मड स्टॅटिक वर्कशॉप, अहिल्यानगर मधील जवानांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सीमेवर तसेच देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

केवळ सण साजरा न करता त्यामागील भावनेला सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठीही भावनिक ठरला. यावेळी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, आर्मड स्टॅटिक वर्कशॉपचे कमाडंट मनराज सिंग, लेफ्टनंट कर्नल विमल चंद, लेफ्टनंट कर्नल नरेंद्र हळदणकर, सुभेदार मेजर सौरभ चंद्रसिंग उपस्थित होते. तसेच पीएमश्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळेच्या शिक्षिका स्नेहल लवांडे, सायली लेंडे आदी उपस्थित होते.

जवानांचे आयुष्य म्हणजे कर्तव्य, शिस्त आणि देशसेवेचा ध्यास. कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यार्थिनींनी दिलेला हा प्रेमाचा धागा विशेष ठरला. राखीच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी जवानांच्या त्यागाला आणि देशसेवेला सलाम केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. रक्षाबंधन निमित्त विद्यार्थिनी आणि जवान यांच्यात निर्माण झालेला हा स्नेहाचा धागा केवळ राखीपुरता मर्यादित न राहता देशप्रेम आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा ठरला. जवानांच्या मनगटावर बांधलेली राखी आणि विद्यार्थिनींच्या मनातील आदरभाव यामुळे आर्मड स्टॅटिक वर्कशॉप मधील रक्षाबंधनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे