महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेत सहभागी व्हा-प्रा. हिरालाल पाटील
महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेत सहभागी व्हा-प्रा. हिरालाल पाटील
प्रतिनिधी :- पंकज पाटिल
पारोळा :-महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेत सहभागी व्हा! आजही त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात केले तर शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात देश प्रगतीपथावर जाईल असे मत प्रा. हिरालाल पाटील यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत, लेखक, स्त्री शिक्षणाचे आद्यजनक, क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेत अभिवादन प्रसंगी विध्यार्थ्यांना सांगितले.यावेळी माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल. एस. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, डी. एस. पाटील, के. आर. पाटील, एम. डी. सूर्यवंशी, प्रा. हिरालाल पाटील, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. तिरुपतीकुमार वारुळे, प्रा.एस. के. देवरे, प्रा.एम. एन. कुत्वर यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी विध्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एच. निकुंभे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांचे सहकार्य लाभले.