सेवापूर्ती निमित्त डॉ. बाळासाहेब कासार,मंगल कासार सन्मान सोहळा उत्साहात

सेवापूर्ती निमित्त डॉ. बाळासाहेब कासार,मंगल कासार सन्मान सोहळा उत्साहात
वाळकी प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
जिल्हा परिषद अहिल्यानगर पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन पर्यवेक्षक पदावर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले डॉ. बाळासाहेब राधुजी कासार,जिल्हा परिषद अहिल्यानगर, प्राथमिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहाय्यिका पदावर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या मंगल लक्ष्मण काळे उर्फ मंगल बाळासाहेब कासार यांचा काष्टी (श्रीगोंदा ) येथे मंगळवारी सेवापूर्ती सन्मान सोहळा पार पडला. नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा पाचपुते,सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कैलास पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत वाळकी, काष्टी, श्रीगोंदा, सारोळा कासार ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी कुटुंबातील ड्रॉ.बाळासाहेब राधुजी कासार, पत्नी मंगल लक्ष्मण काळे उर्फ मंगल बाळासाहेब कासार सारोळा कासार यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतली. शिक्षणानंतर डॉ. कासार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, फलटण,मुंगी पैठण,जिल्हा परिषद अहिल्यानगर आदी ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक म्हणून ३३ वर्ष प्रदीर्घ सेवा केली तर मंगल काळे उर्फ मंगल कासार यांनी जिल्हा परिषद आहिल्यानगर,बारडगाव सुद्रिक ( ता. कर्जत ) पारनेर,काष्टी आदी ठिकाणी ३९ वर्ष प्रदिर्घ केली,प्रदीर्घ सेवेनंतर दोघेही नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवारत असताना त्यांनी मित्र परिवाराला बरोबर घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले.उत्कृष्ट कार्याबद्दल दोघांचाही वाळकी काष्टी ग्रामस्थांच्या वतीने गौरव झाला आहे.
याप्रसंगी सुभाष शिंदे प्रा.सुभाष कळसकर,अनिल पाचपुते,अरुणराव पाचपुते,लालासाहेब फाळके,कृष्णा पाचपुते, सुभाष शिंदे,विठ्ठलराव काकडे, राकेश पाचपुते, दत्ता पाचपुते,श्रीनिवास घाडगे, रमेश बोठे, रमेश ठोंबरे, अशोक ठोंबरे, प्रा.रमाकांत बोठे,,रामदास शेळके, पंडित बोठे, रावसाहेब बोठे, अरुण लांडगे, सदा खेडकर, राजू खेडकर, विष्णू हगवणे, आसाराम खांदवे, प्रा. रोहिदास भालसिंग, लक्ष्मण गोरे, किशोर साठे, अर्जुन कासार, साहेबराव भालसिंग, मल्हारी बोठे,कान्हु बोरकर, मोहन बोठे, रमेश काळे,स्वप्निल शेळके,नितीन बोठेआदींसह पशुसंवर्धन विभागातील, प्राथमिक आरोग्य विभागातील मित्रपरिवार,काष्टी वाळकी व परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
काष्टी (ता श्रीगोंदा ) येथे सेवापूर्तीनिमित्त ड्रॉ. बाळासाहेब कासार, मंगल कासार यांचा मित्रपरिवार ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतिभा पाचपुते,कैलास पाचपुते अरुण पाचपुते उपस्थित होते.