Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

0 8 9 6 7 3

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २५/ अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड करण्यात आली तर प्रदेशाध्यक्ष पदी श्री पंकजसिंह ठाकुर यांनी निवड जाहीर करण्यात आली. राज्यातील निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंह यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या असून, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेची स्थापना 1897 साली झालेली असून या संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतभर असून, संघटना सर्व राज्यामध्ये कार्यरत आहे.

संघटनेच्या माध्यमातून क्षत्रिय समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत आहे. श्री ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल वरिष्ठांनी घेतल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांनी युवा राजपुताना संघटन या संघटनेचे माध्यमातून काम सुरू केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना तसेच विधी सेवा समिती या समितीच्या सदस्यपदी उत्तम कामगिरी नरेंद्रसिंह ठाकूर यांनी पार पाडली. तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाउपाध्यक्ष ,तालुका सरचिटणीस तसेच किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली. अयोध्या येथील सैन्य शहीद स्मारक ट्रस्ट या संस्थेचे सहसचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डिजिटल मीडिया तालुका सचिव या बरोबरच सामाजिक चळवळीत काम करत असताना विविध आंदोलनामध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी त्यांनी आवाज उठवला. संघटनेचे काम करत असताना क्षत्रिय समाजाबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना, शिक्षा, संस्कृती, रोजगार या विषयांना प्राधान्य देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. लवकरच जिल्ह्यामध्ये प्रवास करून जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्रसिंह ठाकुर यांनी दिली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे