Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

0 8 9 6 7 5

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी संजय मस्कर यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. देवेंद्रकुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी दिल्ली संघटनेचे अवनीश कुमार गुप्ता, प्रमोद शर्मा, राजीव भारती, विनीत शुक्ल, दिलीप श्रीवास्तव, पुष्पेंद्र कुमार शर्मा, आणि अनिल कुमार त्रिपाठी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, राष्ट्रीय कार्यकारिणीने ही निवड जाहीर करून त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

संजय मस्कर हे नेशनल ब्युरो म्हणून कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल भारत सरकार चे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक व कारागृह एवं जेल राज्यमंत्री सुरेश राही यांनी अभिनंदन केले आहे. या पदाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, खोट्या एफआईआर वर लक्ष केंद्रित करणे, पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडणे आणि पत्रकार कल्याणासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव संजय मस्कर यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे