वराई दरवाढी वरून बाजार समिती मधील संप मागे,उद्या पासून लिलाव,
कामगार आयुक्तानी दिली आदेशाला स्थगिती , व्यापारी व हमाल यांच्यात यावर विचार होऊन लवकरच तोडगा काढावा-आ शिवाजी कर्डीले
वराई दरवाढी वरून बाजार समिती मधील संप मागे,उद्या पासून लिलाव,
कामगार आयुक्तानी दिली आदेशाला स्थगिती ,
प्रतिनिधी : महेश कांबळे

व्यापारी व हमाल यांच्यात यावर विचार होऊन लवकरच तोडगा काढावा-आ शिवाजी कर्डीले
नगर-गेली ६ दिवसापासून जिल्हातील विविध बाजार समिती मध्ये वराईच्या दरवाढीवरून बाजार बंद ठेवण्यात येत आहे यावर आज महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोदयोग विभागच्या वतीने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी मीटिंगचे आयॊजन केले होते त्यास सरकारी कामगार अधिकारी तथा, सचिव अहिल्यानगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ अहिल्यानगर, चिटणीस, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मुंबई शाखा नाशिक,बॉम्बे गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन मुंबई,सभापती/सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, जि.अहिल्यानगर मधील सर्व,अध्यक्ष/जनरल सेक्रेटरी, अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायत,अध्यक्ष अहिल्यानगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशन,कांदा व्यापारी, जि.अहिल्यानगर,हमाल मापाडी, व्यापारी, व शेतकरी प्रतिनिधी, कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर जिल्हातील सर्व याना आमंत्रित करण्यात आले होते
शिवाजीराव कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मिटिंग मध्ये आवक वाराई दरवाढी वरून बाजार समिती मधील संप मागे घेण्यात आला असून उद्या पासून लिलाव सुरु होणार आहेत तसेच कामगार आयुक्तानी यावेळी दरवाढीच्या आदेशाला स्थगिती दिली यावेळी आ शिवाजी कर्डीले,कामगार आयुक्त श्री भिसले,जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे,शुभांगी गोंड,तालुका उपनिबंधक, हमाल पंचायतीचे राज्य पदधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश घुले,नंदकिशोर शिकरे-अध्यक्ष-व्यापारी कोदा-असो.बाबासाहेब सानप-अध्यक्ष
ट्रान्सपोर्ट असोसिएशन,अशोक लाहे-अध्यक्ष आडते असो.अ.नगर, नगर बाजार समितीचे सभापतीभाऊसाहेब बोठे,उपसभापती रभाजी सुळ यांच्यासह जिल्हातील बाजार समित्यांचे सभापती,उपसभापती,शेतकरी,आडते,खरेदीदार,हमाल,मापाडी बंधू मोठ्या संख्नेने उपस्थित होते
अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायत यांनी दि.२१ऑगस्ट रोजी बंद पुकारल्यामुळे बाजार आवारात हमाल पंचायत संघटना व बाजार समिती संचालक मंडळ यांनी दि. २१/०८/२०२५ रोजी मिटींग मध्यस्थी करुन सदर मिटींग मध्ये पुढील ५ दिवस म्हणजे दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत जुन्या दरानेच आवक वाराई चे काम चालु ठेवण्यास सांगुन त्यांनतर एकत्रित बसुन चर्चा होवुन मार्ग न निघाल्याने आडत्यांनी शेतकऱ्यास एस.एम.एस टाकुन बाजार बंद केला आहे. तसेच अहिल्यानगर जिल्हयातील राहुरी, नेवासा या बाजार समित्यांनी सदर वारई दरवाढीबाबत पत्रव्यवहार केला आहे.उपरोक्त विषयाचे अनुषंगाने बाजार क्षेत्रातील शेतकरी शेतीमाल आवक वाराई दरवाढीबाबत अभिप्रायासह आज दिनांक २९ऑगस्ट रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती
आज या सभेमध्ये सर्वानी आपले मत मांडल्यावर व्यापारी व हमाल यांच्यात यावर विचार होऊन लवकरच तोडगा काढावाअसे आवाहन आ शिवाजी कर्डीले यांनी केले ते म्हणाले कामगार आयुक्तांनी काढलेल्या वराई दरवाढीच्या बाबत गेली सात दिवस विविध ठिकाणच्या बाजार समिती बंद पडत आहे,कुठे व्यापारी, तर कोठे हमाल हा बंद पुकारात आहे. पण मध्यम मार्ग काढायला कुणी तयार नाही म्हणून आजच्या या मीटिंगमध्ये मध्य मार्ग काढूयात आम्ही व्यापारी ,ट्रान्सपोर्ट, हमाल,शेतकरी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, शेवटला हा सर्व भार शेतकऱ्यावर पडत आहे पण त्या शेतकऱ्याचा कुणी विचार करत नाही म्हणून आजच्या या मिटींगचे आयोजन आहे सर्वांनी समजूतदार भूमिका घेऊन बाजार चालू करावेत असे आव्हान आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले
ते पुढे म्हणाले जर कुणीही नोटीस न देता अचानक बंद पुकारात असेल तर तो कोणीही असो ,व्यापारी असो किंवा हमाल असो त्याचे परवाने रद्द करण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधकांना आहे, भविष्यात जर असे घडले. अचानक बंद पाळला गेला तर उपनिबंधकांनी सरळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे. गेले सहा दिवस कांद्याची लिलाव बंद आहे. त्यामुळे कांदा खराब होत आहे त्याला काजळी पडत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे कोणताही खर्च असो मग वराई असो तो शेवटी शेतकऱ्यांना कडूनच वसूल केला जातो आणि गेल्या सहा दिवसात मार्केटला शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे यावर सर्वानी सहमती घेऊन मार्ग काढावा .
यावेळी सर्वानी मिळून निर्णय घेतला पुढील काही दिवसात यावर विचार होऊन लवकरच तोडगा काढण्यात येईल व उद्यापासून लिलाव सुरु होतील तर कामगार आयुक्तांनी वराई दरवाढीच्या आदेशाला पुढील मीटिंग होऊस्तर स्थगिती दिली आहे .



