Breaking
ब्रेकिंग

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १४ व्या दारुवाला पूल शाखेचे उद्घाटन संपन्न

0 3 9 0 3 2

रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या १४ व्या दारुवाला पूल शाखेचे उद्घाटन संपन्न

राहुरी अहमदनगर वृत्तसेवा : जावेद शेख

रुग्णांचे न्याय हक्कांसाठी लढणारी, सर्वच सामाजिक प्रश्नांवर लोकशाही शांततेच्या मार्गाने आवाज उठवणारी संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद सुप्रसिद्ध लोकप्रिय संघटना आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर कमिटीच्या १४व्या शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. दारूवाला पूल, सोमवार पेठ पोलीस चौकी समोर रुग्ण हक्क परिषदेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, दारूवाला पूल शाखेचे अध्यक्ष साईराज जांभळे, आदित्य कांबळे, युवराज साळुंखे, लक्ष चौधरी सह अनेक युवक उपस्थित होते. रुग्ण हक्क परिषदेच्या प्रमुख संघटक रेशमाताई जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार पेठ समोरील दारूवाला पूल शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी पुणे शहर सचिव प्रभाताई अवलेलू, पुणे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, पुणे शहर दक्षिण विभाग अध्यक्ष सुरेश फाले, परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये- मारणे, कार्यालयीन सचिव अमृता जाधव, कसबा पेठ शाखेच्या अध्यक्ष गौरीताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद चव्हाण, पुणे शहर सरचिटणीस शारदाताई लडकत, उपाध्यक्ष आशिष गांधी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रेश्माताई जांभळे यांनी सर्वांचे स्वागत केले. रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना आम्हाला विलक्षण समाधान मिळते असे जांभळे म्हणाल्या. सूत्रसंचालन राजाभाऊ गायकवाड यांनी केले तर साईराज जांभळे यांनी आभार मानले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे