Breaking
ब्रेकिंग

मायरा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण

0 3 9 0 5 0

मायरा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण

एसडब्ल्यू न्यूज / नेटवर्क

नगर तालुक्यातील नारायणडोहो येथील सनोबर सादिक शेख हिची ५ वर्षीची मुलगी मायरा शेख हिने माहे रमजान अशा या पवित्र महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.कडक उन्हाळयात जिवाची लाही लाही होत असताना,अशा अवघड परिस्थितीतही माहे रमजानमध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न, पाणी न घेता जवळपास अखंड चौदा तासांचा रोजा (उपवास) पूर्ण केला आहे. इस्लाम धर्मात पाच तत्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे, दिवसभरात थुंकीही न गिळता पवित्र असा रोजा मुस्लिम बांधव पुर्ण करतात,असा कडक रोजा (उपवास) मायरा जावेद शेख हिने पुर्ण केला असून पहिला रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी (उपवास सोडताना) तिला मिठाई देऊन फुलांचा हार घालण्यात आला होता,एवढया लहान वयातच तिने रमजानचा पहिला उपवास केल्याने त्याचे नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे