स्नेहबंध’तर्फे आकाशवाणी केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
‘स्नेहबंध’तर्फे आकाशवाणी केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
अहिल्यानगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी अहिल्यानगर येथील आकाशवाणी केंद्रात अभिवादन केले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले.
या प्रसंगी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी मुजम्मिल पटेल, कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे, ललिता कात्रे, माजी मुख्याध्यापक एकनाथ जगताप, शिल्पकार बालाजी वल्लाल तसेच विशाल पेन्ट्सचे संचालक हरिष भागवाणी आदी उपस्थित होते.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला समानता, शिक्षण आणि न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचे अनुसरण करून आपण समाजात सकारात्मक बदल घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.”
-डॉ. उद्धव शिंदे
अध्यक्ष – स्नेहबंध फौंडेशन


