Breaking
ब्रेकिंग

काँग्रेसचा २३ जूनला मशाल मोर्चा

0 4 3 3 2 4

काँग्रेसचा २३ जूनला मशाल मोर्चा

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर  :- अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे अमळनेर काँग्रेस कमिटीच्या मशाल मोर्चाचा कार्यक्रम प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने स्थगित केला होता. आता जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप जी पवार यांच्या नेतृत्वात, अंमळनेर येथे, दिनांक २३जून (सोमवार) रोजी मशाल रॅलीचे आयोजन केले आहे.
सदर मशाल रॅली संध्याकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापासून अंमळनेर तहसील कार्यालयात जाईल.

         दरम्यान मागील काही निवडणुका पाहता निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास कमी होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार दिसून आलेले आहेत. त्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करणे व वगळणे, या प्रक्रियेत मोठा गोंधळ व घोटाळा झाल्याच्या तक्रारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी देखील केलेल्या आहेत. तसेच सदर निवडणूकच्या, मतदानाच्या, टक्केवारीतही मोठी तफावत दिसून आलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे