भेंडा बु च्या उपसरपंचपदी संगिता शिंदे यांची बिनविरोध निवड
भेंडा बु च्या उपसरपंचपदी संगिता शिंदे यांची बिनविरोध निवड
जिल्हा प्रतिनिधी : प्रविण देशमुख
भेंडा : नेवासा तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या भेंडा बु ॥ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी – सौ संगिता नामदेव शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
माजी उपसरपंच – पंढरीनाथ फुलारी यां नी रोटेशन पद्धतीने ठरलेल्या प्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्या नंतर भेंडा बु गावच्या सरपंच – सौ रोहिणी नामदेव निकम यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत सौ संगिता नामदेव शिंदे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी तुकाराम मिसाळ, डॉ शिवाजी शिंदे, माजी जि प सदस्य दत्तुभाऊ काळे, गणेशराव गव्हाणे, नामदेव निकम, अशोकराव वायकर, पंढरिनाथ फुलारी, किसनराव यादव, माजी सरपंच सौ वैशाली शिंदे, प्रा उषाताई मिसाळ, संगिता गणेश गव्हाणे, स्मिता देवेंद्र काळे, सुहासिनी किशोर मिसाळ, स्वातीताई अशोक वायकर, लताताई येडुभाऊ सोनावणे, आण्णासाहेब गव्हाणे, दादासाहेब गजरे, संजय मिसाळ, दिलीप गोर्डे, मायाताई गंगावणे, मंगलताई अरुण गोर्डे, वजीर शेख, रामचंद्र गंगावणे, देवेंद्र काळे, संजय गव्हाणे आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक – रेवणन्नाथ भिसे यांनी काम पाहिले .