ब्रेकिंग
देवदत्त शेलार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0
8
6
5
2
1
देवदत्त शेलार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : राष्ट्र भक्ती परिवार आणि विजेता मिडिया पुणे आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दि . १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राजवाडे हॉल सदाशिव पेठ पुणे येथे मुख्य अतिथी डॉ . महेश थोरवे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . गोपालजी खंदारे सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला .
यावेळी श्री देवदत्त आनंदा सुरेश शेलार यांना मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी राजकिय व सामाजिक स्तरातून शेलार यांचे कौतुक व अभिनंदन झाले .
यावेळी श्री .सूर्यकांत सुखदेव गवळी , सौ . भारती ताई रमेश तुपे , डॉ . ज्ञानेश्वर पाटील कायकर, सौ .विद्या खोल्लम आदी प्रमुख पाहुणे व सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
0
8
6
5
2
1



