Breaking
ब्रेकिंग

“योग ही निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे” – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

0 8 6 5 0 8

“योग ही निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे” – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

जागतिक योग दिनानिमित्त ‘स्नेहबंध’च्या शुभेच्छा पोस्टरचे अनावरण

अहिल्यानगर, प्रतिनिधी : २१ जून जागतिक योग दिनानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशन, अहिल्यानगर (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा देणाऱ्या विशेष पोस्टरचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे.”
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “निरोगी समाज घडविण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि विचार सकारात्मक राहतात. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने नियमित योग करण्याचा संकल्प करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा.”
यावेळी ‘निरोगी शरीर, शांत मन – योगाचं साधन, जीवनाचं धन’ हा संदेश देत ‘स्नेहबंध’ वतीने सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘दररोज योग करा, स्वस्थ रहा, समाज निरोगी बनवा’ या संदेशाद्वारे योगाच्या माध्यमातून निरोगी व आनंदी समाज निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे