Breaking
ब्रेकिंग

उजनी धरणक्षेत्र प्रस्तावित प्रकल्पा विरोधात 31 ऑक्टोबर रोजी पुणे सोलापूर महामार्गावर रांजनी येथे आंदोलन; जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे:- ॲड. सविता शिंदे

0 8 9 6 7 5

उजनी धरणक्षेत्र प्रस्तावित प्रकल्पा विरोधात 31 ऑक्टोबर रोजी पुणे सोलापूर महामार्गावर रांजनी येथे आंदोलन; जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे:- ॲड. सविता शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ उजनी धरणक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या ए. आय. डेटा सेन्टर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन व लघु अणुऊर्जा इ. प्रकल्पांना विरोध करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी पुणे सोलापूर महामार्गावर रांजनी येथे आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

अवर्षणप्रवण असलेल्या सोलापूर जिल्यातील बरेचसे शेतीचे क्षेत्र उजनी धरणामुळे बागायत होऊन शेतकऱ्यांना अलीकडेच बरे दिवस आलेले आहेत. तसेच बऱ्याच अंशी जिल्ह्याची तहानही उजनी धरणामुळे भागत आहे. परंतु हे पाणीही पुरेसे नसताना सरकारने उजनी धरण परिसरात ए. आय. डेटा सेन्टर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन व लघु अणुऊर्जा प्रकल्पाचा घाट घातलेला आहे. या प्रकल्पांमुळे शेती, पाणी, पर्यावरण, रोजगार व सुरक्षितता या सर्वांवर दुष्परिणाम होणार आहेत.

सरकारने पारदर्शकपणे याबाबत लोकांना माहिती दिलेली नाही. केवळ आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकार अनेक जनविरोधी प्रकल्प राबवत असून त्यांना कडाडून विरोध करून असे जनविरोधी प्रकल्प हाणून पाडले पाहिजेत. यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती करत असून विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे जास्त जास्त संख्येने सर्वांना या आंदोलनात उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे