नमो बहुउद्देशीय संस्था आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने स्व . मोहम्मद रफी यांची १०० वी जयंती साजरी
नमो बहुउद्देशीय संस्था आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने स्व . मोहम्मद रफी यांची १०० वी जयंती साजरी
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहिल्यानगर : बॉलीवूडचे सर्वोत्कृष्ट गायक स्व . मोहम्मद रफी यांचा १०० वा वाढदिवस नमो बहुउद्देशीय संस्था आणि म्युझिक लव्हर्स ग्रुप च्या वतीने व ग्रामीण पत्रकार संघाच्या सहकार्याने मंगळवार दि . २४ डिसेंबर रोजी नगर येथील चितळे रोड च्या रंगार गल्ली येथे उत्साहात साजरा करण्यात आला . संस्थेच्या सचिव पुनम कानडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले . संस्थेचे अध्यक्ष संजय वायकर यांनी केक कापुन रफींचा जन्मदिवस साजरा केला . स्व . मोहम्मद रफी यांना अभिवादन करून गीत गायनास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित गायकांनी रफींचे गीत गाऊन आनंद व्यक्त केला .
बॉलीवूडच्या एका सुवर्णकाळावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये महोम्मद रफी यांचे नाव अगदी अग्रस्थानी घेतलं जातं. त्यांची गाणी अगदी आज्जी आजोबांच्या काळापासून ते आताच्या तरुण पिढीला देखील तितक्याच पसंतीस उतरतात हे विशेष .
रफींचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते रफीसाहेब याच नावाने ओळखले जातात. आवाजाच्या या महान जादूगाराने १९८० पर्यंत संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले. रफी हे लौकिक अर्थाने आपल्यात नसले तरी असंख्य अजरामर गाण्यांच्या रूपात ते भेटतातच, यापुढेही भेटत राहतील. आपल्या सुमधुर गायननाने रफी यांनी चाहत्यांवर अधिराज्य गाजविले .
सदर कार्यक्रमात ये रेशमी जुल्फे, गुलाबी आँखे , थोडा रूक जाएगी तो , यम्मा यम्मा , बने चाहे दुश्मन , तुम मुझे युँ भूला ना पाओगे , एहसान तेरा होगा मुझपर, तेरी गलियों में आदि बहारदार अजरामर गीते प्रस्तुत करण्यात आली. यावेळी गायक किरण वैकर , विनय गुंदेचा , शिरिष बेगडे, मनिष मुथ्था , राजु शित्रे , पंढरीनाथ लांडगे , किशोर बनसोडे , संजय वायकर आणि ग्रामीण पत्रकार संघाचे माननीय पत्रकार सदस्य उपस्थित होते .