हिवरे बाजारसारखी विकासकामे देशातील इतर गावात व्हावीत– कर्नल बिजॉय आर
हिवरे बाजारसारखी विकासकामे देशातील इतर गावात व्हावीत– कर्नल बिजॉय आर
नारायणडोहो :-प्रतिनिधी / रफिक शेख
दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी कर्नल बिजॉय आर, लेफ्टनंट कर्नल आर.एम.पुरोहित, लेफ्टनंट कर्नल जे.एस.डूल एम.आय.आर.सी.अहिल्यानगर यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली आणि संपूर्ण विकास कामांची पाहणी करून पद्मश्री पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या विभागातील एकूण १५ अधिकारी होते.
कर्नल बिजॉय आर हे पुढे बोलताना म्हणाले,हिवरे बाजार येथे झालेली गुणवत्तापूर्ण विकासकामे देशातील इतर गावात होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.कुठल्याही गावाच्या नेतृत्वाने प्रामाणिकपणे गावासाठी योगदान दिल्यास देशातील कुठलेही गाव आदर्श व्हायला वेळ लागणार नाही.यावेळी यशवंत माध्यमिक विद्यालयातील एन.सी.सी.युनिटतर्फे संचलन करून स्वागत करण्यात आले आणि ग्रामस्थांतर्फे फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच विमल ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे,व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ,एस.टी.पादीर,रो.ना.पादि र, राज ठाणगे मेजर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.