Breaking
ब्रेकिंग

महात्मा गांधी विद्यालयाच्या जयराज दळवे या विद्यार्थ्याचे कॅरम पुणे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश

0 3 9 0 3 7

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ८/ करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील जयराज सचिन दळवे या विद्यार्थ्यांने कॅरम या पुणे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे विभागातील खेळाडूने सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील खेळाडू जयराज सचिन दळवे या खेळाडूने पुणे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. त्याचा सत्कार क्रीडा अधिकारी श्री धारूरकर साहेब यांनी केला त्याची सिंधुदुर्ग याठिकाणी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

त्यांना मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री दळवे एस. बी. सायन्स विभाग प्रमुख, श्री व्ही. एल. पवार, श्री ढेरे सर यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयवंतराव जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त मा. नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त मार्केट कमिटी संचालक श्री शंभुराजे जगताप, संस्थेचे प्राचार्य श्री पाटील बी. के. उपप्राचार्य श्री बागवान ए. एच. जेष्ठ पर्यवेक्षक श्री भोसले सर, पर्यवेक्षिका सौ. नवले मॅडम यांनी खेळाडूचे गुलाब पुष्प देवुन अभिनंदन केले. तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सिंधुदुर्ग याठिकाणी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जयराज दळवे यास भरभरून शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन श्री रसाळ सर यांनी केले. पुढिल वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे