चित्रकला स्पर्धेतून पोलीसांविषयी सकारात्मकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
स्नेहंबधतर्फे पोलीस रेझिंग डे निमित्त चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण...
चित्रकला स्पर्धेतून पोलीसांविषयी सकारात्मकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
स्नेहंबधतर्फे पोलीस रेझिंग डे निमित्त चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण…
एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट
अहिल्यानगर : पोलीस रेझिंग डे निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करून समाजात पोलीसांप्रती आदरभाव निर्माण केला. पोलीसांविषयी सकारात्मक विचारभाव प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याबद्दल स्नेहबंध फाउंडेशनचे आभार, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
पोलीस रेझिंग डे निमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय गटासाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र देशमुख, स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, सुप्रिया खामकर, सुजाता पुंड, निशांत पानसरे, सचिन पेंडुरकर, स्वयंम बास्कर आदी उपस्थित होते. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांची गरज – डॉ. उद्धव शिंदे
लोकांना जशी उपचारासाठी डॉक्टरची गरज असते, इमारतींच्या बांधकामासाठी इंजिनिअरची गरज असते, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांची गरज असते. आपल्या समाजात विविध प्रकारचे लोक एकत्र राहतात आणि एकत्र राहण्याने त्यांच्यासाठी परस्पर संघर्ष देखील वाढू शकतो. त्यामुळे समाजात शांतता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करतात, असे स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यावेळी म्हणाले.
चित्रकला स्पर्धेतील विजेते
लहान गट (एलकेजी) प्रथम क्रमांक- ईशानी अमित खामकर, (१ ली) प्रथम- मयंक गणेश पुंड, प्राथमिक गट -प्रथम-श्रुतिका पाखरे, द्वितीय-अक्षरा पठारे, तृतीय-आदिती बडे माध्यमिक गट-प्रथम- सुयश वराडे, द्वितीय- रुमा कुंभार, तृतीय- आलिया सय्यद



