Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील tv9 मराठी चे पत्रकार शितलकुमार मोटे यांना पुण्यात ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य’ पुरस्कार प्रदान

करमाळा येथील tv9 मराठी चे पत्रकार शितलकुमार मोटे यांना पुण्यात ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य’ पुरस्कार प्रदान

0 3 9 0 4 2

करमाळा येथील tv9 मराठी चे पत्रकार शितलकुमार मोटे यांना पुण्यात ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य’ पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ५/ करमाळा येथील पत्रकार tv9 मराठी चे करमाळा – परांडा चे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांना पुण्यात ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षचे माजी प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, महादेव वाघमारे, जगदीश ओहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पत्रकार मोटे हे करमाळा तालुक्यातील पाथुर्डीचे आहेत. ग्रामीण भागात राहून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. पत्रकारिता करीत असताना राजकीय, सामाजिक, कृषीविषयक, शैक्षणिक, धार्मिक विषयाचे त्यांनी वार्तांकन केले आहे. जगदीशशब्द फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. करमाळा शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री मोटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे