Breaking
ब्रेकिंग

शिक्षण विभागाच्या उर्दू केंद्र प्रमुखपदी फारुख हसन काकर सर यांची नियुक्ती

0 8 6 5 0 9

शिक्षण विभागाच्या उर्दू केंद्र प्रमुखपदी फारुख हसन काकर सर यांची नियुक्ती

फारुख हसन काकर यांचा विविध
सामाजिक संघटनांकडून सत्कार

राहुरी तालुका जावेद शेख

शिक्षण विभागाच्या उर्दू केंद्र प्रमुखपदी फारुख हसन काकर सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहरातील मिल्लतनगर येथील डॉ. डॉ.सलीमभाई शेख यांच्या बैतुशशिफा हॉस्पिटलच्या निवासस्थानी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नजीरभाई शेख होते.
याप्रसंगी शासकीय वात्सल्य समितीचे सदस्य तथा मिलिंदकुमार साळवे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, माजी नगरसेवक मुख्तारभाई शहा, शंभूक विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक व विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे (सर) यांनी आपले मनोगत व्यक्त करून फारुख हसन काकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इकबाल इस्माईल काकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष जाकीरभाई शहा यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी फैयाजभाई बागवान, विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष डॉ.सलीमभाई शेख, मिलिंदकुमार साळवे, मुख्तारभाई शहा, सलीमखान पठाण, अशोकराव दिवे, नजीरभाई शेख,अकबरभाई शेख, भैय्याभाई शहा, श्री. त्रिभुवन, जाकीरभाई शहा, इब्राहिम बागवान, शकील खान, इमाम सय्यद, अल्ताफ काकर, अबूबकर शहा, साबीर शहा, मुख्तारभाई मनियार, इम्तियाजभाई पठाण, साजिदभाई शेख, इरफान कुरेशी, जाफरभाई शहा, गुफरान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे