तिसऱ्या नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन. .
तिसऱ्या नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन. .
नगर / प्रतिनिधी
शुक्रवार १७ जुलै रोजी अहिल्यानगर च्या , लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, एसटी स्टँड रोड येथे तीसरी नरेंद्रजी फिरोदिया चषक अखिल भारतीय सतराशे पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाअध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगाना इत्यादी राज्यातून तीनशे च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. लौकरच येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तसेच गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून वरील स्पर्धा आयोजित केली आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी आजपर्यंत बुद्धिबळा साठी दिलेल्या योगदानाला वंदन म्हणून त्यांच्या नावाची ही तीसऱ्यांदा स्पर्धा आयोजित होत आहे असे अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
साडेचार वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपल्या बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत.
शुक्रवारी १७ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता ह्या स्पर्धचे शुभारंभ होणार असून. त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. रविवारी दुपारी ४.००वा तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेत विविध गटात पाच लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ७० करंडक व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना पवन राठी (पुणे),शार्दुल टापसे (सातारा),दीपक चव्हाण (वाशिम), शिशिर इंदुरकर ( नागपूर), प्रशांत घगेकर, देवेंद्र ढोकळे (नगर)आदी सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावली नुसार होणार आहे.
या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे १०० लाकडी पट व सोगट्या हे राहणार आहे. १०० आंतरराष्ट्रीय दर्जाचे लाकडी पटांचा वापर भारत पहिल्यांदा होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, मनीष जसवानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, सचिन कांबळे (पाथर्डी), शिवा काळे (श्रीरामपूर), कु दुर्गा ढोकळे (शेवगाव), संकेत गाडे (कोपरगाव), संजय खडके, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, अतुल कोठारी,सौ शुभदा ठोंबरे,डॉ. स्मिता वाघ, सौ. रोहिणी आडकर आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील बुद्धिबळ चाहत्यांनी, खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क यशवंत बापट. ९३२६०९२५०१ व पारूनाथ ढोकळे ९८५०७०४२६८.


