Breaking
ब्रेकिंग

यात्रोत्सवासाठी प्रशासनाची सर्वतोपरी तयारी ; माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांची प्रत्यक्ष पाहणी*

0 7 6 9 4 1

*यात्रोत्सवासाठी प्रशासनाची सर्वतोपरी तयारी ; माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांची प्रत्यक्ष पाहणी*

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :-जळगाव जिल्हयातील अमळनेर येथील खान्देशाचे “प्रतिपंढरपूर” म्हणून ओळखले जाणारे यात्रोत्सवासाठी प्रशासनाची सर्वतोपरी तयारी सुरु असुन. प्रशासन 2026 साठी परिपुर्ण सज्ज आहे व
माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी बोरी नदी पात्रातील यात्रा स्थळ व मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
          यात्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भावीक
भक्त मोठ्या सख्यने उपस्थिती अपेक्षिती असुन.
भाविकांना कोणत्याही प्रकाराच्या गैरसोयी ला
सामोरे जाऊ नये.यासाठी मार्ग नियोजन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रण यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले की, “अमळनेरची यात्रा ही खान्देशच्या संस्कृतीचे प्रतीक असून भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
 नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी नगरपालिका प्रशासनाला यात्रेदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. तसेच हायमास्ट दिवे, रोषणाई, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका आणि अतिक्रमण निर्मूलन यावरही भर देण्यात आला आहे.
         पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत सीसीटीव्ही कॅमेरे, साध्या वेशातील पोलिसांची गस्त आणि दुकाने तसेच पाळण्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले.यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेला रथोत्सव २७एप्रिल २०२६ रोजी, तर पालखी सोहळा १ मे २०२६ रोजी पार पडणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक श्रीराम चौधरी, अबू महाजन, गुलाब पाटील, नवीद शेख, दादा पवार, कैलास पाटील, पंकज भोई, सूरज परदेशी, तुलशीराम हटकर तसेच पंकज भावसार, परेश उदेवाल, नईम पठाण आणि इतर सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिका पदाधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
          प्रशासनाच्या या सक्रिय पुढाकारामुळे यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुखकर ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे