Breaking
ब्रेकिंग

मानवी जीवनामध्ये विचार व दृष्टी चांगली असल्यास जीवन सफल होते : ज्ञानेश्वर तांबे

वाळकी धर्मनाथ उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आवाहन..

0 7 6 9 3 4

मानवी जीवनामध्ये विचार व दृष्टी चांगली असल्यास जीवन सफल होते : ज्ञानेश्वर तांबे

वाळकी धर्मनाथ उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आवाहन..

वाळकी प्रतिनिधी :- आपल्याला मिळालेला मानवी देह हा अमूल्य आहे.विचाराने आपण प्रबळ असले पाहिजे.दृष्टी चांगली असली पाहिजे.विचार आणि दृष्टी चांगली असल्यास मानवी जीवन सफल होते. त्यामुळे तुम्ही लहानपणीच आपल्या मुलांना संस्काराचे बाळकडू पाजणे गरजेचे आहे.मातोश्री जिजाऊने शिवबा घडविले.आपणही आपल्या मुलांना सत्य व धर्माची शिकवण द्यावी.पुढे उच्चशिक्षित करावे असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले.
वाळकी ( ता. नगर ) येथील श्री.धर्मनाथ महाराज उत्सवानिमित्त शनिवार (दि. २६) जुलै ते शनिवार (दि.२ ) ऑगस्ट पर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी ( दि.२७ ) रोजी सायंकाळी सात ते नऊ तांबे महाराज यांची कीर्तन सेवा झाली.ते पुढे म्हणाले टीचभर पोट भरण्यासाठी मोठीच उठाठेव करावी लागते.त्यामुळे मुलांवर लहानपणी संस्कार करण्यात आपण कमी पडतो.संस्कार विना आजची पिढी भरकटली आहे.लहानपणीच मुलांना चांगले संस्कार देणे व विचाराने प्रबळ बनवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सप्ताहाची ४७ वर्षांपासून ही परंपरा चालू आहे.कोरोनामुळे दोन वर्षे सेवा खंडित होती.धोंगडे गुरुजी राहुरी, राजाराम कासार यांनी सप्ताहाची परंपरा चालू केली. त्याच्या नंतर गुलाबतात्या कासार, त्रिंबक कासार, निवृत्ती कासार यांनीही ही सेवा पुढे चालवली.तिघाही जनाचे निधन झाल्याने सर्वच तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत सप्ताहाची परंपरा चालू ठेवली आहे.सप्ताहात पहाटे पाच ते सहा काकडा भजन,सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी दोन ते तीन संगीत भजन,सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ,रात्री सात ते नऊ हरी किर्तन,नऊ ते दहा महाप्रसादअसे कार्यक्रम होणार आहे.
सप्ताहात ह.भ.प.सोनाली दीदी करपे, ज्ञानेश्वर महाराज तांबे, अनिताताई महाराज सुद्रिक, वनिताताई पाटील, महेश महाराज मडके, स्वामी अरुण नाथगिरी महाराज,संदीप महाराज खंडागळे यांची किर्तन सेवा होणार आहे. शनिवार दि. २ आँगस्ट रोजी सकाळी १० ते १२ संजय महाराज धोंगडे यांची कीर्तन सेवा होणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.किर्तन सेवा श्रवण करण्यासाठी हजारो भाविक भक्त येत आहेत.किर्तन सेवा श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी गावातील दानशुरांच्या मदतीतून रोज अन्नदान करण्यात येत आहे.कार्यक्रम यशस्वी साठी तरुणवर्ग,ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत.

 


वाळकी (ता. नगर ) येथील धर्मनाथ महाराज उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची कीर्तन सेवा झाली.

( छाया – दादासाहेब आगळे,गुंडेगाव  )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे