यशवंतनगर गाव ते वडारवाडी मुख्य रस्त्याच्या कामास सुरुवात
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने घेतली माहिती

यशवंतनगर गाव ते वडारवाडी मुख्य रस्त्याच्या कामास सुरुवात
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने घेतली माहिती
प्रतिनिधी : धीरज लांडगे
यशवंतनगर गाव ते वडारवाडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे कामाची आज दि . १२ जुन रोजी पासून सुरुवात झाली . यावेळी ज्या संघटनेने या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठ पुरावा केला आणि अखरे रस्त्यांचे काम सुरू झाले अशा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सदर कामाची पाहणी केली . जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक,विकास पंडित,पवन सेवक,अक्षय चव्हाण,संजय ढाकणे,मोरे मेजर आदी नागरीक उपस्थित होते.
या रस्त्यासाठी माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे . लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे.ठेकेदार जय आंबेकर यांच्या बरोबर जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे यांनी चर्चा करून सदर रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा असे सांगितले .