सात्रळ महाविद्यालयात नवीन कायदेविषयक जनजागृती तथा सायबर गुन्हे या विषयावर राहुरी पोलीस स्टेशन कडून सेमिनार
सात्रळ महाविद्यालयात नवीन कायदेविषयक जनजागृती तथा सायबर गुन्हे या विषयावर राहुरी पोलीस स्टेशन कडून सेमिनार
विशेष वृत्तसेवा : जावेद शेख
माननीय मुख्यमंत्रीसाहेब यांच्या पोलीस विभागाच्या शंभर दिवसांच्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नवीन कायदेविषयक जनजागृती तथा सायबर गुन्हे प्रतिबंध या अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे वतिने विविध शाळा महाविद्यालयामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी आज सकाळी 11 ते 11:45 दरम्यान लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे सायबर क्राईम गुन्हे प्रतिबंध व नवीन कायदेविषयक जनजागृती सेमिनार घेऊन २७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रो. डॉ. रामदास बोरसे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले, प्रा. डॉ. सुषमा उंडे, उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी सोदाहरण माहिती देण्यात आली. आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. कायद्याची प्रक्रिया सोपी, सुलभ झालेली असून त्यासाठी सत्यनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक असते, असे श्री. ठेंगे साहेब म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. जयश्री सिनगर यांनी केले. प्रा. दीप्ती आगरकर यांनी आभार मानले.