पंढरी माझ्या दारी – – श्रीकांत देशमुख

पंढरी माझ्या दारी
नुसतं म्हंटल मी करतो पंढरीची वारी,
वटारल्या डोळ्या वदले सारे एक सुरी,
भक्ती भाव तुमच्या चंचल मनी कसा हो येणार?
वासना सागरी विठ्ठलासच का ते बुडवणार? १नुसतं म्हंटल मी करतो पंढरीची वारी,
क्षणात चालू लागली सगळ्यांची शब्द-सूरी ,
क्षणोक्षणी टीका टिप्पणी वारकऱ्यांशी कां करणार?
विषयांचा गजर का त्यांच्या मनी बाणवणार ? २नुसतं म्हंटल मी करतो पंढरीची वारी,
तर उमटले सार्यांच्या मुखी हास्य ते आसुरी,
वारीत जे पानी पडले ते कसे हो गोड मानणार?
प्रत्येक पदार्थात खोड काढण्याची सवय कशी हो विसरणार? ३नुसतं म्हंटल मी करतो पंढरीची वारी,
म्हणाले सर्व बसा तुम्ही गुपचूप घरी,
दोन पावलं चालून भरतो दम उरी ,
रिंगण बघूनच गळेल तुमची हिम्मत सारी !४नुसतं म्हंटल मी करतो पंढरीची वारी,
तर बसले शब्दांचे घावे ते उरी,
म्हणाले तुम्ही विषयाशक्तीचे अभंग गाणारे सरदार,
निरागस वारकऱ्यांशी कसली हो चर्चा तुम्ही करणार? ५हबकलो मी, मिटले मी डोळे, स्तब्ध जाहली वाचा,
अन्तकरणी विठ्ठल परी राहिला उभा साचा,
म्हणाला कळली मला तुझी भावना ,
सर्व सोडून आलो बघ वसण्या तुझिया मना !विसरलो मी अहं, सरली द्वैते सारी,
भरता अमोघ भक्ती भाव उरी ,
आले ओठी नाम सहज, जय जय रामकृष्ण हरि,
जय जय रामकृष्ण हरि !विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
– – – श्रीकांत देशमुख ( पुणे )



