Breaking
ब्रेकिंग

पोलिओचे दोन थेंब, प्रत्येक बालकाचा हक्क’ – डॉ. उद्धव शिंदे”

0 8 6 5 0 8

“‘पोलिओचे दोन थेंब, प्रत्येक बालकाचा हक्क’ – डॉ. उद्धव शिंदे”

डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटलतर्फे २१ बूथवर पल्स पोलिओ लसीकरण

अहिल्यानगर, प्रतिनिधी :

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटल, भिंगार यांच्या वतीने ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी २१ लसीकरण केंद्रांवर (बूथ) विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ भिंगार येथील मारुती मंदिर परिसरातील लसीकरण केंद्रावर उत्साहात करण्यात आला.
या मोहिमेवर डॉ. गीतांजली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका नीलम परदेशी यांनी लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी करून नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. यावेळी अंगणवाडी सेविका अनिता भांड, मदतनीस विद्या भादवे व कोमल शेलार यांनी लसीकरण मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
या प्रसंगी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे उपस्थित राहून मोहिमेला शुभेच्छा दिल्या तसेच पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. लसीकरण ही केवळ आरोग्याची नव्हे तर प्रत्येक बालकाच्या सुरक्षित भविष्याची हमी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.”

( भिंगार येथील मारुती मंदिर परिसरात आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, आरोग्य सेविका नीलम परदेशी, अंगणवाडी सेविका अनिता भांड, विद्या भादवे, कोमल शेलार व आदी. )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे