Breaking
ब्रेकिंग

लोकमान्य लोकार्पणाला आता मिळाली राजमान्यता अमळनेर येथील ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचे आज लोकार्पण

७७ लाखांच्या निधीतून स्मारक साकार

0 4 3 3 2 9

लोकमान्य लोकार्पणाला आता मिळाली राजमान्यता अमळनेर येथील ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचे आज लोकार्पण

७७ लाखांच्या निधीतून स्मारक साकार

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर – नगरपरिषद प्रभाग क्र. ७ मधील जय हिंद कॉलनी येथे ७७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या क्रांतिकारक डॉ. उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांच्या क्रांती पर्व स्मारकाचे लोकार्पण आज २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे स्मारक झाकलेले असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. स्मारक उघडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. काहींनी या विषयावरून वेगळी चर्चा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर, थोर क्रांतिकारकांचे स्मारक झाकून ठेवणे हे अपमानास्पद असल्याचे मत व्यक्त होत होते.

या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेने स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला असून, आ. अनिल पाटील यांच्या शुभहस्ते आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे