Breaking
ब्रेकिंग

चिचोंडी पाटील उपबाजाराच्या जागेची आ.शिवाजी कर्डिलें कडून पाहणी

0 7 6 9 3 5

चिचोंडी पाटील उपबाजाराच्या जागेची आ.शिवाजी कर्डिलें कडून पाहणी

प्रतिनिधी : महेश कांबळे

नगर- चिचोंडी पाटील येथील उपबाजाराचा भूमिपूजन समारंभ पनन मंत्री जयकुमार रावत यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. उपबाजारच्या जागेची पाहणी आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक येथील विवा मंगल कार्यालयात आमदार कार्डिले यांच्या उपस्थिथीत झाली.

यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, मनीषा घोरपडे, रामदास सोनवणे, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, संजय गिरवले, सुधीर भापकर, दत्ता तापकीरे, भाऊ भोर, मधुकर मगर, राजू आंबेकर, सुभाष निमसे, धर्मनाथ आव्हाड, भाऊसाहेब ठोंबे, राजेंद्र बोथरा, नीलेश सातपुते, हरिभाऊ कर्डिले, अशोक कोकाटे, विष्णू खांदवे, सुधीर भद्रे, सचिव अभय भिसे, बाळासाहेब लबडे, संदीप शिंदे, शाम घोलप, बाबासाहेब काळे ,बाजीराव हजारे,विष्णू खांदवे गुरुजी,अशोक कोकाटे,पांडुरंग ससे,बाबासाहेब काळे ,श्याम घोलप,रफिक मामू,तुकाराम दाताळ ,सचिव भिसे साहेब अशोक चोभे आदी उपस्थित होते.

३० ऑगस्ट रोजी चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यात गाळे आणि जनावराचा बाजार असेल. कांदा मार्केट सुरू करण्याचाही विचार आहे. पण त्यासाठी आणखी जागा उपलब्ध करून घ्यावी, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कार्डिले यांनी केले.

प्राप्ताविकात सचिव अभय भिसे यांनी उपबाजारच्या आराखड्या विषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्याच्या वतीने विष्णू खांदवे यांनी परिसरातील नागरीकांतर्फे कांदा मार्केट सुरू करण्याची मागणी केली. सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ यांनी मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे