कोपरगाव माध्यमिक शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर*
पुणे विभाग व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन निवड; शिक्षक प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार
*कोपरगाव माध्यमिक शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर*
पुणे विभाग व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन निवड; शिक्षक प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार
राहुरी तालुका जावेद शेख
महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासनमान्य शिक्षक संघटनेच्या कोपरगाव तालुका माध्यमिक विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पार पडली असून, यात तालुक्यातील अनुभवी व सक्रिय शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षक चळवळीला आता नवी उभारी मिळणार आहे.राज्याध्यक्ष अशोक बेलसरे,कार्याध्यक्ष सुभाष मोरे,राज्य सचिव सुनील गाडगे,
पुणे विभागाचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. तालुकाध्यक्ष दिगंबर देसाई व उच्च माध्यमिक तालुकाध्यक्ष नरेंद्र लहीरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे.
अशी आहे नूतन कार्यकारिणी :
संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्री. गडकर संजय कोंडाजी (सोमय्या विद्या मंदिर, साखरवाडी) आणि श्री. विकास बबन भागवत (संजीवनी ग्रामीण विद्यालय, नाटेगाव) यांची निवड झाली आहे. सचिव म्हणून श्री. महेश बळीराम काळंगे (श्री ग.रा. अवताडे पाटील विद्यालय, पोहेगाव) तर खजिनदार म्हणून श्री. नितीन निवृत्ती शेटे (विद्या प्रबोधनी, कोपरगाव) यांची वर्णी लागली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून मुकुंद कैलास हाडोळे (श्रीमान गोकुळचंद्रजी विद्यालय, कोपरगाव) आणि कोषाध्यक्ष म्हणून श्री. जपे गोकुळ सुखदेव यांची निवड करण्यात आली.
मार्गदर्शक मंडळाचे पाठबळ :
संघटनेला भक्कम दिशा देण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा बँक संचालक अतुल कोताडे, माजी मुख्याध्यापक गजानन शेटे आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक कैलास थोरात यांचा समावेश आहे.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कटिबद्ध राहील. तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांना संघटित करून अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे काम जोमाने केले जाईल.
— दिगंबर देसाई, (तालुकाध्यक्ष)
या निवडीबद्दल तालुक्यातील शिक्षक वृंदातून समाधान व्यक्त होत असून, नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


