Breaking
ब्रेकिंग

काय सांगता ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्यात ?

0 3 9 0 3 6

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीही येणार ?

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ५/ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे येत असून दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची भव्य सभा होणार असून या सभेला करमाळा विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. अत्यंत राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावून निवडणूक प्रतिष्ठितेची केली आहे. याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता सोलापूर विमानतळावर येणार असून तेथून हेलिकॉप्टरने करमाळा येथे येणार आहेत. त्यांची बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून या सभेनंतर पुढे त्यांच्या परंडा बार्शी धाराशिव उमरगा अशा चार सभा आहेत.

ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिवसेनेचे समन्वयक विलासराव घुमरे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश करचे, शहरप्रमुख संजय शिलवंत, महिला आघाडी नेत्या पद्मजा इंगवले, उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, दादासाहेब तनपुरे, वैद्यकीय सहाय्यक दीपक पाटणे, नागेश चेंडगे, कुडूवाडी शहर प्रमुख समाधान दास, महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी,हरोहित बलाक्षी, सागर कोल्हे, अनिता पवार आदी शेकडो पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. याशिवाय भाजप आरपीआय रयत शेतकरी संघटनाअजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट पदाधिकारी

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे