Breaking
ब्रेकिंग

पीएनपी चषकाचा दर्जा अधिक उंचावेल – – जयंत पाटील यांचे प्रतिपादन निमंत्रित 24 संघामध्ये होणार लढत

आयपीएलच्या धर्तीवर मिळणार अलिबागमध्ये क्रिकेट खेळाचा आनंद

0 3 9 0 7 2

पीएनपी चषकाचा दर्जा अधिक उंचावेल – – जयंत पाटील यांचे प्रतिपादन निमंत्रित 24 संघामध्ये होणार लढत

-आयपीएलच्या धर्तीवर मिळणार अलिबागमध्ये क्रिकेट खेळाचा आनंद

अलिबाग / प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपिठ मिळावे, यासाठी नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षी पासून पीएनपी चषक क्रिकेटचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेली पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा राज्यभर गाजली. पीएनपी चषकाचे हे दुसरे वर्ष आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनामुळे याही वर्षी स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

पीएनपी चषकाचे अनावरण व खेळाडूंचा लिलाव सोहळा बुधवारी (दि. 05) कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील,शेकाप राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, आदी मान्यवरांसह संघ मालक, संघाचे व्यवस्थापक, कर्णधार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे