वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, प्राथमिक, माध्यमिक, डी.डी. नाईक जुनियर कॉलेज च्या वतीमे आषाढी एकादशी सोहळा साजरा
प्रति पंढरपूर येथील श्री विठ्ठल नामाचा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी
वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, प्राथमिक, माध्यमिक, डी.डी. नाईक जुनियर कॉलेज च्या वतीमे आषाढी एकादशी सोहळा साजरा
प्रति पंढरपूर येथील श्री विठ्ठल नामाचा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा :- पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, प्राथमिक, माध्यमिक, डी.डी. नाईक जुनियर कॉलेज मध्ये वसंतनगर आश्रम शाळेत विठू नामाचा गजर करीत श्री हरी विठ्ठल-रुख्मिणी यांचा सजीव देखावा तयार करण्यात वसंतनगर आश्रमशाळा आला होता.
वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाने आश्रम शाळेत पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थी हितेश ईश्वर जाधव विध्यार्थिनी हंसिका विलास जाधव यांनी श्री हरी विठ्ठल-रुख्मिणी मातेचा हभेहुभ देखावा सादर करून विठू नामाचा गजर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी केला.
यावेळी टाळ, मृदूंग, विणेकरी, ध्वनीयंत्राच्या साहाय्याने डोक्यावर तुळशी अशा भक्तिमय वातावरणात गावातून पायी वारी काढीत विद्यार्थी या भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले पाहवायास मिळाले. या प्रति पंढरपूर येथील श्री विठ्ठल नामाचा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
याप्रसंगी मुख्याध्यापक सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



