Breaking
ब्रेकिंग

साधना विद्यालय व आर.आर.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात हरित रक्षाबंधन उत्साहात साजरा.

0 8 6 6 8 2

साधना विद्यालय व आर.आर.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात हरित रक्षाबंधन उत्साहात साजरा.

राहुरी तालुका जावेद शेख

‌राखीच्या पवित्र नात्याला पर्यावरणपूरक वळण देत, साधना विद्यालय व आर. आर. शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात “हरित रक्षाबंधन” उत्साहात साजरा करण्यात आले. परंपरेने बहीण भावाला राखी बांधते, परंतु या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून कापड, कागद, बिया, कापूस, वाक यांच्या वापर करून जवळ जवळ १०० पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या व त्या विद्यालयातील वृक्षांना बांधून त्यांच्या सुरक्षिततेची शपथ घेतली.
आजच्या काळात शहरीकरण, औद्योगिकीकरण व आर्थिक विकासच्या नावाखाली प्रंचड वृक्षतोड होत आहे. परिणामी समृद्ध जैवविविधता असलेली आपली भूमी ओसाड बनत चालली आहे. महावृक्ष तोडून त्यांच्या जागी लहान रोपे लावल्याने पर्यावरणाचे नुकसान भरून येण्यासारखे नाही. निसर्ग स्वतः परिपूर्ण आहे फक्त मानवी हस्तक्षेप रोखणे गरजेचे आहे. असे मत शाधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केले.
साधना विद्यालयातील हरित सेना पथकातील विद्यार्थ्यांसाठी हरित रक्षाबंधन या उपक्रमाचे योजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना वृक्ष हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करणे, त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. हरित रक्षाबंधन पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाचे आहे तसेच आजच्या आधुनिक युगात खूप महत्वाचे आहे, असे मत राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख श्री. अमोल चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव डी. जी., उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे उपस्थित होते. तसेच ज्युनिअर विज्ञान विभाग प्रमुख श्री. सावंत डी. बी., श्री. महामुनी एन. आर., सौ. साधना खोत, सौ. बोडके आर. व्ही., सौ. माने एच, एस., श्री. टेंगले के. एम., श्री. भागवत एन. पी., श्री. क्षीरसागर टी. टी., श्री. लोंढे पी. बी., श्री. पिसे एस. ए., जुनिअर कॉलेजचे सर्व सहकारी शिक्षक बंधू – भगिनी आणि हरित सेनेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे