Breaking
ब्रेकिंग

विठूरायाच्या नामघोषात निघाली सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम (सी.बी.एस.सी) स्कुलची दिंडी

0 8 6 6 6 2

विठूरायाच्या नामघोषात निघाली सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम (सी.बी.एस.सी) स्कुलची दिंडी

राहुरी तालुका जावेद शेख

रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तिमय तयार झाले आहे. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम (सी.बी.एस.सी ) स्कूल येथील शाळेच्या चिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली.

ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा आकर्षक पेहराव केला होता. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला.
प्रांगणातमध्ये विद्यार्थीनी लेझीम,फुगडी,रिंगण,अभंग,गायन, भक्ती, गीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरतुन दिंडी सोहळा पार पडला. प्रांगणात विद्यार्थ्यांना अल्प प्रसाद वाटप करण्यात आले.

या दिंडिंची संकल्पना व मार्गदर्शन विद्यालयाच्या प्राचार्य सौ.योगिता आठरे मॅडम,व सर्व शिक्षक वृंद यांचे होते. दिंडीचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.महानंद माने खजिनदार श्री.महेश घाडगे व संचालक यांनी आनंद व्यक्त केला तसेच उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती बाबर ,सौ.वाघमारे मॅडम,सौ.वाबळे मॅडम,सौ.जोशी मॅडम,सौ.उंडे मॅडम,सौ.शेख मॅडम,सौ.तोडमल मॅडम,सौ.अंजुम शेख मॅडम ,सौ.डागवले मॅडम, कु.शिंदे मॅडम,कु.खंडागळे मॅडम,सौ.पवार श्री.निकाळजे सर,श्री.मोरे सर,श्री.वाघ सर,श्री.पंढारे सर,श्री.भिंगारदे सर,श्री.साळवे सर,आदी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे